जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथून बस स्थानकासमोर पार्किंगला लावलेली प्रवाशी ॲपे रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल अडकमोल (वय-२४, रा. नशिराबाद बसस्थानकाच्या मागे ) कुटुंबीयांसह राहतो. त्यांच्याकडे (एमएच १९ सीडब्ल्यू २२९८) क्रमांकाची ॲपे रिक्षा आहे. १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १८ सप्टेंबर सकाळी ५ वाजेच्या दरम्यान बसस्थानकाजवळ लावलेली दीड लाख रुपये किमतीची ॲपे रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु रिक्षा आढळून आली नाही. अखेर २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी नशिराबाद पोलिस ठाण्यात निखिल अडकमोल यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो हेकॉ गुलाब माडी करीत आहे.







