पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा : ४०० दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वाटप
जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद शहरासाठी स्ट्रीटलाईट व पाणीपुरवठा याकरिता विजेसाठी नवीन सोलर प्रकल्प राबण्यात येण्यासाठी तब्बल ५ कोटी रु. निधी मंजूर करणार आहे. नशिराबाद भुयारी गटार योजना अंतिम टप्प्यात असून, लवकरात लवकर त्यास मंजुरी मिळवून शहराच्या विकासाला गतीमान करण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ते नगरपरिषदेमार्फत दिव्याग कल्याणकारी योजनेंतर्गत शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वाटप कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. नशिराबाद नगरपरिषद झाल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतच्या दराप्रमाणे वेतन मिळत होते. सफाई कर्मचारी यांचे वेतन वाढ करण्याबाबत मागील बऱ्याच दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत गांभीर्य पूर्वक दखल घेवून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार नशिराबाद मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी नगरपरिषदेच्या ४२ सफाई कामगारांना किमान वेतनप्रमाणे वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले. नगर परिषदेमार्फत दिव्याग कल्याणकारी योजना अंतर्गत शहरातील ४०० दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रास्ताविक माजी सरपंच विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बी. आर. खंदारे यांनी केले तर आभार मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी मानले.
यावेळी माजी उपसरपंच किर्तीकांत चौबे, विकास पाटील, शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे मंत्री गुलाबराव पाटील यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत असल्याचे मान्यवरांनी सांगितले. नशिराबाद शहरासाठी स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा याकरिता विजेसाठी नवीन सोलर प्रकल्प मंजूर करण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी सोनवणे यांचा करीत असलेल्या उत्कृष्ट कामामुळे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख विकास धनगर, युवसेनेचे चेतन ब-हाटे, प्रदीप साळी, चंद्रकांत भोळे, प्रकाश माळी, नीळकंठ रोटे, किरण पाटील, योगेश पाटील व लेखापाल दौलत गुट्टे, मनोज गोरे, अभियंता अतुल चौधरी, सचिन पल्हाडे, संतोष रगडे, न. प. अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग बांधव, शहरातील नागरिक उपस्थित होते.