जळगाव बसस्थानकातील एसपी ऑफिससमोरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- बसमध्ये चढत असताना नाशिक येथील महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना बुधवारी दि. २७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली ज्ञानेश्वर गांगुर्डे (३६, रा. नाशिक) या जळगाव येथील नवीन बसस्थानकात जळगाव ते पाचोरा या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोकॉ नरेश सोनवणे करीत आहेत.