मुक्ताईनगर येथे ३ कोटी ८४ लाखांचा साठा जप्त
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- अन्न व औषध प्रशासनाचे गुप्तवार्ता विभागास मालेगाव मनमाड रोडवरुन कर्नाटकातुन दिल्ली येथे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतुक ट्रकमधुन होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने दाभाडे यांनी हॉटेल हरयाणा मेवात ढाबा व-हाणे शिवार येथे शोध घेतला असता त्यांना रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतुक करणारे तब्बल ११ ट्रक हॉटेलल्या मागे छुप्या पध्दतीने लावलेले आढळून आले. सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये किटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व ते लपविण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारी चा सुमारे २५२ टन साठा मिळून आला. त्यामुळे नाशिक कार्यालयाचे पथकास पाचारण करण्यात आले. सदर पथक घटनास्थळीदाखल झालेनंतर सुपारीचे एकुण ११ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येवून उर्वरीत २५२.३टन किंमत रुपये ३ कोटी ८४ लाख १९ हजार ९८३ इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
सदरचे नमुने विश्लेशणासाठी पाठविण्यात आलेले असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे अविनाश दाभाडे, अन्न् सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता यांचे मार्फत करण्यात येत आहे. सदर कार्यवाही ही अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), प्रमोद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, योगेश देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी, गोपाळ कासार, अन्न सुरक्षा अधिकारी, अमित रासकर, अन् सुरक्षा अधिकारी, तसेच महिल अन् सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन व श्रीमती सायली पटवर्धन यांचे समवेत सचिन झुरडे नमुना सहाय्यक यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे.