जळगाव : लॉकडाऊन झाल्याने कामधंदा बंद झाले. त्यामुळे मजूर कुटूंबीय गावाकडे परतु लागली आहेत. जळगाव येथून एका बारा वर्षीय मुलीस दुचाकीवर बसवुन सशयिताने पळवून नेले होते. संशयिताच्या शोधासाठी जळगाव पोलिसांची सात पथके रवाना केली होती. गोपनीय माहितीवरून सोमवारी नाशिक पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी गणेश सखाराम बांगर वय ३२ मालेगाव जि. वाशीम याला अटक केली.
मुलंड मुबंई येथून भाऊ व बहीण हे मजूर कुटूंब सीसामासा जी. अकोला जात होते.दि एकोणाविस तारखेला हे भाऊ बहीण कालिका माता मंदिर जळगाव येथे वृक्षाखाली छायेत बसली होती. त्यावेळी दुचाकीने आलेल्या सशयिताने गावाकडे जात असल्याचा बहाना करून दोघा भाऊ बहिणीला बसवुन ट्रीपलसिट निघाला. डॉ.उल्हास पाटील मेडिकल कालेजपुढे त्याने दुचाकी दुपारी ३.४५ वाजता थांबविली. पोलीस गाडीपुढे असल्याचा बहाना करत त्याने तरुणाला उतरवत तू पुढे चालत ये, असे सांगत मुलीस पळवून नेले. या प्रकरणी भावाने दिलेल्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी तत्काळ नाकाबंदी करून मुलीच्या शोधात मोहीम राबविली. २० मे रोजी ही पीडित मुलगी अमरावती ग्रामीण अंतर्गत लोणी पोलीस स्टेशन हद्दीत सुखरूप मिळून आली होती.
रस्त्याने गावी जात असलेल्या मुली व महिलांना संशयित आरोपी फसवणूक करून पळवून नेतो, अशी माहिती जळगाव पोलिसांना मिळाली. त्या नंतर या आरोपीची माहिती काढून त्याचे फोटो प्रसारित केले.व त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी एलसीबी सह पोलीस व अधिकाऱ्यांचे सात पथक तयार करून ते बाहेरच्या जिल्ह्यात रवाना केले.