जळगाव — रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलीट (आरआयडी ३०३०) चा भव्य पदग्रहण समारंभ गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सन २०२४-२५ या वर्षासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा पदग्रहणाची शपथ देण्यात आली.यावेळी आर.टी.आर. मोहित शम्नानी, जिल्हा आयएसडी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी रोटरॅक्ट क्लबच्या कार्याबददल माहिती देत येत्या वर्षातील नियोजन विषद केले. आर.टी.आर. भूमिका नाळे यांची अध्यक्ष म्हणून आणि आर.टी.आर. निधी पाटील यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिका यांनी रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलीटच्या कार्याचा सन्मान राखण्याची आणि सेवा व नेतृत्वाद्वारे समाजाला योगदान देण्याची शपथ घेतली. कार्यक्रमात प्रा. रश्मी टेंभुर्णे आणि प्रा. सुमित निरमल हे शिक्षक सदस्य, अपूर्वा भातुरकर, आकांक्षा डोंगरे, सौंदर्या पटेल, आचल मिलके, प्रतीक्षा वर्मोडे, आणि हर्षा कुमभरे हे उत्साही विद्यार्थी सदस्य उपस्थित होते. समारोप प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा व्यक्त केल्यात.