पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील नांद्रा येथे नव्याने सुरू होत असलेल्या नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. चा भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता संपन्न होणार आहे.
उपस्थितीचे आवाहन आ. किशोर पाटील, आदर्श ऍग्रो अँड ऍग्रीटेक संचालक राजेंद्र पाटील, नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि.नांद्रा जनरल मॅनेजर विजय पाटील यांनी केले आहे.