• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ : आश्रमशाळेतील मुलावर हल्ला करून हिंस्त्र पशूने घेतला जीव..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2024
in खान्देश, महाराष्ट्र
0

नंदुरबार तालुक्यातील लोय गावातील घटना

नंदुरबार (प्रतिनिधी) : नंदुरबार शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील लोय गावातील आश्रम शाळेतील इ.२ री चा निवासी विद्यार्थी मनोहर कालुसिंग वसावे (मु.कोढली पो. मोरंबा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार) या चिमुकल्यावर हल्ला करून बिबट्याने ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. परंतु, हल्ला करणारा प्राणी बिबट्याच होता का? याची शहनिशा संबंधित अधिकारी करीत आहेत.

दरम्यान प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाच्या पालकांना शासनाच्या वतीने सुमारे दहा लाखाची तातडीची रोख मदत जाहीर करण्यात आलेली आहे. शासकीय नियमानुसार २५ लाख रुपये रोख भरपाई देण्यात येते. त्यापैकी ही तातडीची दहा लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (केसीएन)नंदुरबार तालुक्यातील लोय गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळा असून आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थी मनोहर कालुसिंग वसावे (मु.कोढली पो. मोरंबा ता. अक्कलकुवा) हा गुरुवार दि. २९ रोजी सकाळी मृत अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह छिनविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने त्याच्यावर बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून चिमुकल्याला ठार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ही घटना कळताच वन खात्याचे अधिकारी तातडीने धाव घेत त्यांनी पाहणी केली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी चंद्रकांत पवार यांनी मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून माहिती घेतली. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोय ता.जि. नंदुरबार येथे गुरुवार दि २९ रोजी पहाटे सुमारे ६ वाजेच्या दरम्यान इ. २ री चा निवासी विदयार्थी मनोहर कालुसिंग वसावे (मु.कोढली पो. मोरंबा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार) या विदयार्थ्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला. मनोहर जखमी असल्याबाबत चौकीदार यांनी मुख्याध्यापक माळी यांना कळविले. माळी यांनी पाहणी केली असता विदयार्थ्याच्या गळयावर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरु होता.

त्यामुळे तातडीने विद्यार्थ्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले. बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (केसीएन)हल्ला करणारा प्राणी बिबट्याच आहे का याची खात्री करणे सुरु आहे. दरम्यान मयत विद्यार्थ्यांचे नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर आणखी माहिती उघड होईल असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


 

 

Previous Post

आम्हाला कचऱ्याच्या दुर्गंधीपासून सुटका कधी मिळणार ? नागरिकांचा आर्त सवाल..!

Next Post

खळबळ : केळीच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खळबळ : केळीच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon