पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे आज तुफान अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आला त्यामुळे परिसरातील बऱ्याच लोकांच्या शेतीत व घरामध्ये पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले
काही शेतकरी लोकांची जनावरे वाहून गेली पाण्याच्या टाक्यापासून ग्रामपंचायतपर्यंत पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन पुरामध्ये वाहून गेल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्याकरता काम लवकर मार्गी लावावे आमदार किशोर पाटील सध्या मुंबईत आहेत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील यांना घटनास्थळावर अधिकाऱ्यांसोबत पाठवले जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह बापू , पाणी पुरवठा अधिकारी राठोड व सुधाकर पाटील यांनी भर पावसात फिरून नुकसानीची पाहणी केली ते माहिती घेऊन शासनाकडे पाठवणार आहेत यावेळी ग्रामस्थ , उपसरपंच उपस्थित होते ग्रामस्थ दत्तू ढमाले , सुनील सोनवणे , एस आर पाटील व जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या नुकसानीचा अंदाज घेतला या गावातील काही लोकांच्या घरातील भांडी आणि अन्य साहित्यही पाण्यात वाहून गेल्याचे यावेळी सांगण्यात आले.