धुळे (प्रतिनिधी) – हँलो धुळे साप्ताहिकाचे मुख्यसंपादक नानासाहेब नगराळे यांची भारतीय किसान सेना(सेक्युलर) पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड
जिल्हा प्रतिनीधी (विश्राम तेले) चिमठाणे ता.शिंदखेडा जि.धुळे येथील माजी सैनिक व सा. हँलो धुळे या साप्ताहिकाचे मुख्य संपादक नानकलाल सोबजी नगराळे यांची भारतीय किसान सेना (सेक्युलर)या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली व भारतीय किसान सेना (सेक्युलर) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव शाहिदभाई मंसुरी,भारतीय किसान सेना राष्ट्रीय संघटक विपस्सीभाई वसावा भारतीय किसान सेना प्रदेश महासचिव पंडीत तडवी व उत्तर महाराष्ट्र संघटक सुरेश जगदेव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
या नियुक्ती बद्दल हँलो धुळेचे सहसंपादक श्री कांतीलाल पाटिल,जळगाव जिल्हा प्रतिनीधी विश्राम तेले,चोपडा तालुका प्रतिनीधी आकाश पाटिल सहीत परीसरातील सर्व मान्यवरांकडून नानासाहेबांचे अभिनंदन करण्यात आले.








