जळगाव ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनीं केलेल्या अवमानजनक विधानाचा भाजप जिल्हा ओबीसी मोर्चाकडून करण्यात आला आहे . पटोले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे .
जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की , आम्ही नाना पटोले यांचा जाहीर निषेध करीत आहोत . त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी . मी मोदींना मारू शकतो मी मोदींना शिव्याही देऊ शकतो असे नाना पटोले यांचे विधान म्हणजे एक प्रकारे धमकीच आहे . त्यांच्याविरोधात कारवाई न झाल्यास भाजप ओबीसी मोर्चा आंदोलन करिन . यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी माध्यमांसमोर जिल्हा भाजपची भूमिका स्पष्ट केली.