नवी मु्ंबई (वृत्तसंस्था ) ;– नवी मुंबईला विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांकडून आज (गुरुवारी) सिडको भवनाला घेराव घालण्यात येत आहे. हजारो कोळी आणि आगरी बांधव नवी मुंबईच्या रस्त्यावर उतरले असून हा जमाव सिडको भवनाच्या दिशेने निघालायं. यावेळी हे बांधव आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये गाणी गातं आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. या विमानतळाला ज्येष्ठ नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपूत्र आणि प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. मात्र, ठाकरे सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचे ठरवले आहे. यावरुन भूमिपुत्रांमध्ये रोष आहे.