एरंडोल (प्रतिनिधी) :- येथील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ अर्थात शिंपी समाज शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
याबाबतचे पत्र त्यांनी उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांना दिले आहे. या वेळेला माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी नगरसेवक मनोज जगदाळे, राज्य संघटक मनोज भंडारकर, उप महानगर प्रमुख प्रमोद शिंपी, जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे उपस्थित होते.