जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पोलिसांकडून सीमावर्ती भागात नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान दोन दिवसांपूर्वीच अमळनेर तालुक्यात कोटीची रोकड सापडली होती. यानंतर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासणीत कारमध्ये ६३ लाखांची रोकड मिळून आली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान पोलिसांकडून सीमावर्ती भागात नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याच नाकाबंदी दरम्यान जळगाव तालुक्यातील कासोदा येथे दीड कोटी रुपये तर अमळनेर तालुक्यातील चोपडाई येथे १६ लाख ३८ हजार रुपये सापडून आले होते. यानंतर पुन्हा एकदा जळगाव शहरात ६३ लाखांची रोकड सापडून आल्याने जळगावात खळबळ उडाली आहे. शहरातील आकाशवाणी चौकात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान रोखण्यात आलेल्या एका कारमध्ये रोकड आढळून आली आहे. पोलिसांनी हि रोकड जप्त करून मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.