भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे एका तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर रविवारी जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
आकाश अशोक चव्हाण (वय २२ रा. शिंदी ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, लहान बहीण, आजोबा यांच्यासह राहत होता. आई हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत होती. (केसीएन) तर बहिणीचे शिक्षण चालू होते. मयत आकाश चव्हाण हा पुणे येथे काम करून शिक्षण घेत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी आकाशने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, रविवारी भुसावळ येथील डॉक्टरांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घालवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मध्यरात्री उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. घटनेमुळे शिंदी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.