चाळीसगांव – राज्याच्या चौफेर विकासाची दृष्टी असलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी राज्याला हरीत क्रांतीकडे नेले. वाडे तांडे वस्तीतील बंजारा समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली. त्यामूळे डोंगर दऱ्यातील समाजात शैक्षणीक प्रगती झाली. त्यांच्या दूरदृष्टीतून तंत्रशिक्षणाची द्वारे खुली झाल्याने माझा सारखा तरूण अभियंता होऊ शकला असे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. आज बंजारा समाज विकास मंडळाच्या वतीने अभिवादन तथा कृषीदिन कार्यक्रम दत्तमंदिर येथे आयोजीत करण्यात आला.
सुरुवातीला खासदार उन्मेश दादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी बंजारा समाज मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव राठोड ,मंडळाचे सचिव भावलाल राठोड, मंडळाचे ज्येष्ठ संचालक तथा माजी जिल्हा परिषद सुभाष चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड , बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, पंचायत समितीचे माजी सभापती विजय जाधव, माजी पंचायत समिती सदस्य रामदास जाधव,स्टार फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. तुषार राठोड, सरपंच डॉ. महेंद्र राठोड, प्रेमसिंग राठोड, सुदाम चव्हाण,अनिल चव्हाण, विनित राठोड ,भास्कर चव्हाण, पंडित चव्हाण, नरेंद्र काका जैन,रवी राजपूत ,विलास चव्हाण, सर्वेश पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.