चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले एकुण ११ मोबाईल अंदाजे किंमत १ लाख १० हजार किं.चे संच हस्तगत करुन ते मुळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.
चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील चालु वर्षी व आजपावेतो बरेच मोबाईल गहाळबाबत संबंधीत मोबाईल धारक यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेल्या होत्या. सदर तक्रारीबाबत डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधिक्षक, कविता नेरकर, अप्पर पोलिस अधिक्षक, विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वेळोवेळी मासिक क्राईम मिटींग दरम्यान सूचना केल्या होत्या.
मोबाईल धारकांनी पुरविलेल्या माहीतीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन, जळगांव यांचे तांत्रिक विश्लेषण करिता मदत घेवुन चाळीसगांव ग्रामीण पोलिसांनी एकुण ११ मोबाईल अंदाजे किंमत १ लाख १० हजार किं. चे मोबाईल संच हस्तगत करुन ते मुळ मोबाईल धारकांस दि.५ डिसेंबर रोजी कविता नेरकर, अप्पर पोलिस अधिक्षक, विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय अधिकारी चाळीसगांव भाग यांचे हस्ते परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि नितीन पाटील, सफौ युवराज नाईक, पोहेकॉ संदिप पाटील, पोकों विजय पाटील, पोकाँ बाळु बाविस्कर नेम चाळीसगाव ग्रामीण पो. स्टे व पोना ईश्वर पाटील, पोकों गौरव पाटील, पोकों मिलींद जाधव अश्यांनी केली आहे.









