नागपूर (वृत्तसंस्था) – रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे येत्या काळात भाजप तांदूळ घोटाळ्याचा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. प्रंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता रेशन दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे.
तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. या घोटाळ्यात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी, राईस मिलचे मालक अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेतील रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहेत त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. चौकशी झाल्यास अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.