नागपूर : नागपूरमधील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत सलग तिसर्या दिवशीही मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात ७ रुग्ण आढळले आहेत. नव्याने आढळलेल्या सातही रूग्णाचा संपर्क नागपुरातील सतरंजीपुरा परिसराशी आला आहे.
मध्यंतरी काही दिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या. संख्येत वाढ झाली नव्हती. मात्र, मागील तीन दिवसांपासून दररोज रूग्ण संख्या वाढतच असल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन चिंतेत पडले आहे. आतापर्यंतच्या दैनंदिन वाढीमध्ये रविवारी १४ रूग्णांची झालेली वाढ ही सर्वात मोठी वाढ होती. त्यानंतर सोमवारी ६ आणि मंगळवारी ७ रूग्ण वाढले आहे. आता चोवीस तासात आणखी ७ रूग्ण वाढल्याने नागपुरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ५४ एवढी झाली आहे. आज (दि. १४) आढळलेले सातही नवे रूग्ण नागपूरच्या आमदार निवासातील विलगीकरण कक्षात होते.