जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील शिरसोली येथे नागपंचमी निमित्त सूर्यवंशी बारी पंच मंडळतर्फे शासनाच्या नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने गवळणी करून नागवेल पूजन सुनील आडबाल यांनी सपत्नीक पूजन केले . यावेळी प्रथम आलेले विद्यार्थीना वही पेन,कलर पेन,फोल्डर फाईल असे साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष सुभाष अस्वार यांनी व सर्व पंच मंडळींनी ग्रामपंचायत सरपंच हिलाल भिल , उपसरपंच श्रावण ताडे, रामकृष्ण काटोले,शाम अस्वार,मिठाराम पाटील,भगवान बोबडे,गौतम खैरे,विनोद अस्वार गोकुळ ताडे,मुद्स्सर पिंजारी यांचा सत्कार करण्यात आला . कृषी अधिकारी श्री. पाटील ,कमलेश पवार यांनी कृषी विषयक माहिती दिली,प्रस्तावना सुरेशदादा अस्वार यांनी केले. उपाध्यक्ष अनिल ताडे,श्रावण ताडे, सुनील बारी,नारायण काटोले,उत्तम सुंने, ज्ञानेश्वर अस्वार,देवराम नागपुरे,भगवान भुते,,रामकृष्ण काटोले,उत्तम अस्वार,अर्जुन काटोले,मोहन बुंधे,दशरथ फुसे, सचिव भगवान भुंध्ये,श्रीकांत अस्वार आदी यावेळी उपस्थित होते.









