जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेचे प्रभाग क्र. ३ येथील नगरसेवक दत्तात्रय देवराम कोळी यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी शनिवारी १९ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने उपचारादरम्यान सकाळी १० वाजता निधन झाले. त्यांच्यावर संध्याकाळी पाच वाजता कांचन नगर येथील राहत्या घरून निघणार आहे.
दत्तात्रय कोळी यांनी प्रभाग क्र. ३ येथून नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. तसेच, ते पाचव्यांदा नगरसेवक झाले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.