जळगाव ( प्रतिनिधी )- नगरपंचायत निवडणुकीची मतदान केंद्रे असलेल्या बोदवड शहरातील २ शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी २ दिवसांची सुटी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , बोदवड नगरपंचातीच्या प्रभाग क्रमांक २ ३ १५ व १७ च्या निवडणुकीचे मतदान १८ जानेवारीरोजी होणार आहे . या मतदानासाठी मतदान केंद्रे असलेल्या जि प मराठी मुलींची शाळा क्रमांक १ ( सकाळ कॉलनी ) आणि जि प मुलांची उर्दू शाळा ( जुना मनूर रोड ) या दोन शाळांना १७ व १८ जानेवारीरोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.