अहमदनगर (वृत्तसंस्था ) – महिलेने स्वतःला पेटवून घेत घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आहे. पुजा मनोहर चुग (वय ३३ रा. तारकपूर) असे जखमी महिलेचे नाव आहे.
अहमदनगर शहरातील तारकपूर भागात आज सकाळी ही घटना घडली.जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुजा चुग यांनी कोणत्या कारणातून पेटवून घेतले याची माहिती समोर आली असून पोलीस तपास करत आहेत.
पुजा आज सकाळी घरातील दुसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी पेटवून घेतले. काही कळायच्या आत ही महिला ओरडत आपल्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून उडी मारली.