नगरदेवळा : – महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेले भोरस येथील पहेलवान राहूल आगोणे यांचा महाराष्ट्र केसरी जळगाव जिल्हा माती विभागातून केसरी गट विजयी झाल्याबद्दल क्षत्रिय फुलमाळी समाज नगरदेवळयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.येथील सावता महाराज मंगल कार्यालयात झालेल्या छोट्याखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवनारायण जाधव होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प.सदस्य रावसाहेब पाटील,कुस्ती मल्ल विद्या महासंघ उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस धर्मराज पाटील ,सरपंच पती किरण काटकर ,पोपट महाजन ,राजेंद्र महाजन ,राजेश जाधव ,अविनाश कुडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली .यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्व कुस्तीगिरांचा टोपी रुमाल देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र केसरी या स्पर्धेसाठी निवड झालेले राहूल आगोणे यांना शाल ,श्रीफळ व चांदीची गदा भेट देऊन सन्मानित करण्यात आले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक प्रवीण महाजन,विकी जाधव ,सुनील महाजन व क्षत्रिय फुलमाळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संतोष महाजन यांनी केले.