जळगाव ( प्रतिनिधी ) — येथील पोलन पेठ परिसराचे महात्मा ज्योतिबा फुले नगर असे नामकरण उद्या अन्न पुरवठा व नागरी संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
याप्रसंगी खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर महाजन, प्रदेशाध्यक्ष संतोष इंगळे, प्रदेश सचिव वसंत पाटील, शिवसेना नेते तथा केशव क्रीडा मंडळ अध्यक्ष किशोर भोसले, जिल्हाध्यक्ष रवींद्र माळी, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.
हा नामांतर सोहळा चित्रा चौक येथे २४ सप्टेंबररोजी आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे , आ. चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, नगरसेविका ज्योती तायडे, सरिता नेरकर, माजी नगरसेवक किशोर भोसले, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी या नामांतरण सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







