मुंबइ -देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहमार असून या काळात नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. मात्र पान, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे. याच कारणास्तव आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा धुम्रपान करण्यास मनाई असल्याचे यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते.