मुंबई (वृत्तसंस्था) – जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतातही नुकतीच डीजीसीआयकडून लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. व्हायरसचा धोका अजूनही कमी झालेला नाही. कोरोनाच्या संक्रमणामुळे सतत घरात बसून आधीच वृद्धांना श्वासांचे आजार, अस्थमा, कमकुवत इम्यूनिटी, डायबिटीस, हृदयरोग यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनसुार व्हायरसनं शरीरात प्रवेश केल्यानंतर फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आज आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत. अशी लक्षणं तुमच्याही शरीरात दिसत असतील तर फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा प्रसार झालेला असू शकतो. अशी शक्यता तज्ज्ञाकडून वर्तवली आहे.
कोविड -१९ मुळे खोकल्याची समस्या उद्भवते. कोरडा खोकला केवळ कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे लक्षण आहे. तुम्हाला बराच काळ खोकला राहिला आणि सुरुवातीच्या संसर्गानंतर दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सुधारणा न झाल्यास कोरोना फुफ्फुसांमध्ये पसरल्याचे लक्षण असू शकते. या व्यतिरिक्त हे पोस्ट कोविडचे चिन्हही असू शकते. अशी समस्या उद्भवल्यास आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
श्वास घ्यायला त्रास होणं किंवा डिस्पेनिया ही समस्या एक समस्या आहे ज्यावेळी एखाद्या प्रकारचे संक्रमण होते तेव्हा ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचणे अवघड होते. ही समस्या वयोवृद्धांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते परंतु ही समस्या इतर लोकांना देखील होऊ शकते. जर आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग देखील पसरत आहे. हे लक्षण पोस्ट कोविड मध्ये देखील दिसते. ना डाएट, ना जीम; नवीन वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ 5 सवयी ठेवाल; तर परफेक्ट फिगर मिळवाल
डॉक्टरांनीही सुचना दिल्या आहेत की श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत तीव्र वेदना होत असतील तर हे , फुफ्फुसातील कोरोनाच्या प्रसाराचे लक्षण आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, अन्यथा ते जीवघेणे ठरू शकते.







