मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. यातच देशाचे गृहमंत्री तसेच भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा ट्विटद्वारे दिल्या आहेत.
सध्या त्यांचा ट्विटची चर्चा सोशल माध्यमांमध्ये चांगलीच होत आहे. अमित शाह यांनी ट्विटवरुन देवेंद्र फडणवीस यांना टॅग करुन शुभेच्छा देताना, ‘असेच महाराष्ट्रासाठी काम करत राहा,’ असं म्हटलं आहे.
अमित शाह यांनी ट्विट केले आहे की,’ ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही अशाच उत्साहाने आणि समर्पित भावनेने महाराष्ट्र राज्यातील लोकांची सेवा करत रहावी. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,’ असं शाह यांनी म्हटलं आहे.







