पाचोरा (प्रतिनिधी)- येथे रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चा पदग्रहण समारंभ नुकताच (१२जुलै रोजी) अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सन २०-२१ या वर्षासाठी पाचोरा भडगाव रोटरी क्लब अध्यक्षपदी रो.डॉ. प्रशांत पाटील तर सेक्रेटरी पदी रो.डॉ.अमोल जाधव यांची निवड होऊन त्यांना पदभार सोपवण्यात आला. कोविड-१९ संसर्ग पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्याच रोटरी सदस्यांच्या उपस्थितीत परंतु अत्यंत उत्साहात हा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
शक्ती धाम , भडगाव रोड पाचोरा येथे संपन्न या पदग्रहण समारंभाच्या प्रारंभी भारतीय सीमेवरील शहीद, कोरोना आजारातील मृतात्मे, तसेच रोटरी परिवारातील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे मावळते अध्यक्ष रो.डॉ.भूषण मगर यांनी मागील वर्षातील आपल्या कार्यकाळातील विशेष उल्लेखनीय उपक्रम, पुरस्कार व रोटरी चळवळीतील आपल्या क्लबचे योगदान याबद्दल अहवाल सादर केला. मावळते सचिव डॉ बाळकृष्ण पाटील यांचे तर्फे रो. रोहन पाटील सर यांनी मागील कार्यकाळातील क्लबचा लेखाजोखा सादर केला .
पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो.डॉ.भूषण मगर पाटील यांनी नवनियुक्त अध्यक्ष रो.डॉ. प्रशांत पाटील यांना अध्यक्षपदाची कॉलर व चार्टर प्रदान केला, तर मावळते सचिव यांच्या वतीने रो.रोहन पाटील यांनी या वर्षाचे नूतन सचिव रो.डॉ. अमोल जाधव यांना सेक्रेटरी पदाची पीन प्रदान केली.
नूतन अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आगामी वर्षाचा संकल्प जाहीर करणारे मुद्देसूद मनोगत व्यक्त केले. यानंतर रोटरी क्लब मध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांचे रोटरी पिन देऊन स्वागत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने डॉ.मुकेश तेली , डॉ.निळकंठ पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. निखील जैन आदींचा समावेश होता.यावेळी रोटरीचे प्रांतपाल रो. शब्बीर शकिर आणि असेच उपप्रांतपाल रो. योगेश भोळे यांनी झूम च्या माध्यमातून संदेश दिला.
या कार्यक्रमाला,शक्तीधाम चे संचालक रो.रमेश मोर, रो.डॉ.योगेंद्रसिंह मोरे, रो .प्रदीप पाटील, रो.सुयोग जैन, रो. रुपेश शिंदे , रो.डॉ. पवन पाटील, रो.राजेश मोर,,रो.निलेश कोटेचा, रो.अतुल शिरसमणे, रो.डॉ. घनश्याम तेली,रो.डॉ.गोरख महाजन , रो.डॉ. दिनेश सोनार, रो.शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. क्लबचे सीनियर रोटेरियन डॉ.जवाहर संघवी, रो.चंद्रकांत लोढाया,रो. पुरुषोत्तमभाई अग्रवाल व रो.भरतकाका सिनकर यांनी झूम ॲपच्या माध्यमातून पदग्रहण समारंभाला शुभेच्छा दिल्या.
रो. शैलेश खंडेलवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ,रो.राजेश मोर यांनी प्रास्ताविक केले, नूतन सचिव रो. डॉ.अमोल जाधव यांनी आभार मानले. रोटरी क्लब पाचोरा भडगाव व झोनमधील अन्य सहयोगी रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी झूम ॲपच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थिती दीली.