यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील फैजपूर येथील व्यक्तीचे सुरक्षा बलाच्या जवानाला भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात महत्वाची कागदपत्रे व ५ हजार रूपयांची रोकड बेवारसपणे आढळून आल्याने आधारकार्डच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेवून सर्व कागदपत्रे व रोख रक्कम परत केली. जवानाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे सर्वत्र कौतूक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील फैजपुरला राहणारे व भुसावळ येथील रेल्वे कर्मचारी बालू डवले या व्यक्तीचे आधारकार्ड, पॅनकार्ड यासह काही महत्वपूर्ण कागदपत्रे तसेच ५ हजाराची रोकडचे पाकीट भुसावळ रेल्वे स्टेशन डीआरएम भागात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मोहसीन पिंजारी फैजपूर सेवा बजावत असतांना बेवारस स्थितीत आढळून आले. मोहसीन पिंजारी यांनी आधारपत्राद्वारे संबंधित व्यक्तीला शोधून बालू डवले यांना सुरक्षा बलाचे अधिकारी के.एम.शिंदे यांच्याहस्ते पाकीट रोख रक्कमसह स्वाधीन केले आहे.
सुरक्षा अधिकारी कुंदन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर येथील सुरक्षा बल जवान मोहसीन पिंजारी यांनी केलेल्या कर्तृत्व इमानदारीचे बालू डवले, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी कुंदन शिंदे यांनी अभिनंदनपर कौतुक केले आहे. मोहसीन पिंजारी हे फैजपूरचे पत्रकार सलिम पिंजारी यांचा मुलगा आहे. मो हसीन पिंजारीने केलेल्या या आदर्शचा सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.