मुंबई (वृत्तसंस्था) – नवी मुंबईमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे . क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या महिलेचा बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे . डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत बलात्काराचा प्रकार केल्याचा गुन्हा पनवेल मधील कोरोना सेंटरमध्ये घडला आहे . या घटनेमुळे सर्वत्र एकचं खळबळ उडाली आहे .
मुंबई – पुणे एक्सप्रेसवेच्या बाजूला खाजगी बिल्डरांनी उभ्या केलेल्या गृहप्रकल्पात पनवेल महानगरपालिका आणि नवीमुंबई महानगरपालिकेने कोरोना सेंटर बनविले आहे . या कोरोना सेंटरमध्ये एकाच इमारतीत स्त्री आणि पुरूषांना ठेवण्यात आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते आहे . दरम्यान , या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार पनवेल मनपाने अलगिकरणात ठेवलेल्या युवकाने हे कृत्य केले आहे . अलगिकरणात इमारती मधील दुसऱ्या मजल्यावर आरोपी युवकाला ठेवले होते . तर पीडित महिला सहाव्या मजल्यावरील अलगिकरण रूममध्ये होती .क्वारंटाईन सेंटरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे ही सेंटर्स सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.







