मुंबई :- संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनापुढे जगातील सर्वच देश हतबल झाले आहेत. राज्यातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोनामुळे देशात अनेकांचे मृत्यू झाले असून यात ४१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालले आहे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, “राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढण्याचे प्रमाण सुरू आहे. मुंबई राज्यातील कोरोनाचे केंद्र बिंदू बनले आहे. सध्या देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी महाराष्ट्रातील रुग्ण संख्या जास्त आहे. यात कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी ४१ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.
रोज ही संख्या वाढत आहे.” असेही फडणवीस म्हणाले आहेत.
“अशा संकटाच्या काळात सरकरकडून फक्त आकड्यांची फेरफार केली जात आहे. काल एका दिवसात ८ हजार रुग्ण डिस्चार्ज झाल्याचे दाखवण्यात आले असून डिस्चार्ज रेट वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. राज्यातील लोक कोरोनातून बरे होत असतील तर यांचा आनंदच आहे. नागरिक कोरोनापासून चांगलेच झाले पाहिजेत.”
दरम्यान, कोरोना संदर्भात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सरकारने पुरवल्या पाहिजेत. मुंबईतील लोकांना बेड्स, ऑक्सिजन आणि रुग्णवाहिका मिळत नाही, रस्त्यावर लोकांचा मृत्यू होत आहे. याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे यासंदर्भातील कारवाई होणं अपेक्षित आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.