जळगाव (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कलाशाखेच्या पदवीच्या तृतीय वर्षाच्या मानसशास्त्र विषयाचे प्रात्यक्षिक मु.जे. महाविद्यालयातील केंद्रात २९ व ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.
सन 2019 – 20 ला पदवीच्या तृतीय वर्षाच्या कला शाखेतील मानसशास्त्र स्पेशल विषयाच्या प्रात्यक्षिकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षा मु.जे. महाविद्यालयातील केंद्रात २९ व ३० सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 5 च्या दरम्यान होणार आहे. अधिक माहितीसाठी मु.जे. महाविद्यालय येथे संपर्क करावा.प्रात्यक्षिक परीक्षा जर न दिल्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन नुतन मराठा महाविद्यालयाचे केंद्र प्रमुख प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख व केन्द्र संयोजक डॉ. डि.आर. चव्हाण जळगाव यांनी केले आहे.