• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’ला “व्हाईट वॉश” : सर्वत्र जल्लोषाला उधाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’ला “व्हाईट वॉश” : सर्वत्र जल्लोषाला उधाण

११ मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व  

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे महायुतीने सर्व ११ जागा जिंकत आपले वर्चस्व राखले आहे. महाविकास आघाडीला जिल्ह्यात खातेही उघडता आले नाही. कॉंग्रेसकडे असलेली रावेरची जागाही हातून गेली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा या ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदारांना मतदारांनी संधी दिली आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वच युतीचा झेंडा फडकला आहे.

मतमोजणीला सकाळी साडेआठ वाजेता प्रारंभ झाल्यानंतर सुरूवातीपासूनच युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम दिसून आली. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण व शिवसेना (उबाठा) गटाचे उन्मेश पाटील यांच्यात लढत झाली. यात मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात सर्वाधिक लीड घेत विजय नोंदविला. जळगाव ग्रामीणमध्ये आजी- माजी पालकमंत्र्यांमध्ये मुख्य लढत झाली. यात शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.

राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रा. दिलीप खोडपे यांचा पराभव केला. मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रोहिणी खडसे यांचा पराभव केला. तर पाचोरा येथील लक्षवेधी लढतीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उबाठा वैशाली पाटील यांचा पराभव केला.

चोपड्यात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे व उबाठा गटाचे प्रभाकर सोनवणे यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकांत सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला. रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचे धनंजय चौधरी यांना आस्मान दाखवित कॉंग्रेसकडे असलेली एकमेव जागा खेचून आणली. भुसावळमध्ये पुन्हा भाजपचे संजय सावकारे यांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांचा पराभव केला. जळगाव शहर मतदारसंघात भाजपाचे सुरेश भोळे यांनी विजय नोंदवित शिवसेना ठाकरे गटाचे जयश्री महाजन यांचा पराभव केला. अमळनेरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी अपक्ष व माजी आ. शिरीष चौधरी, काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना पराभूत केले. एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला.


 

Tags: #mviaala-whait-whash
Previous Post

आ. महाजन झाले सातव्यांदा आमदार, सुरेशदादांच्या विक्रमाशी साधली बरोबरी

Next Post

पित्याचा वारसा आता पुत्राकडे, अमोल पाटील झाले आमदार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमोल चिमणराव पाटील भरणार सोमवारी उमेदवारी अर्ज

पित्याचा वारसा आता पुत्राकडे, अमोल पाटील झाले आमदार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon