जळगाव (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या कला व वाणिज्य शाखेचे परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
सन – २०१९-२० मध्ये प्रवेश घेतलेल्या तृतीय वर्षाच्या कला व वाणिज्य पदवीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची ५ ऑक्टोबर पासून तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांची १३ ऑक्टोबर पासून परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन असून ते एखाद्या संगणक केंद्रावरून अथवा मोबाइल, लॅपटॉपवरून देऊ शकतात. विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी काही अडचण असल्यास नुतून मराठा महाविद्यालयाच्या केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्र प्रमुख प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख व केन्द्र संयोजक डॉ. डि.आर. चव्हाण जळगाव यांनी केले आहे.