भुसावळ जाण्यासाठी अवजड वाहतूक वाहनधारकांना फेऱ्याने जावे लागणार
जळगाव (प्रतिनिधी) :- श्री स्वामीनारायण मंदिर, जळगांव “मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव” जळगांव शहरात दूरदर्शन टॉवर भुसावळ रोड, या ठिकाणी दि. १० ते १७ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक मार्गावर पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर फक्त अवजड वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी ०७.०० ते रात्री ११.०० वा पावेतो वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिलेले आहेत.
भुसावळकडून धुळ्याकडे जाणारी वाहनांसाठी पर्यायी मार्ग – नाहाटा कॉलेज, जामनेर, नेरी, वावडदा, म्हसावद, एरंडोल मार्गे वळविण्यात आलेली आहेत. भुसावळकडून जळगावकडे जाणारी वाहनांसाठी पर्यायी मार्ग नाहाटा कॉलेज, जामनेर, नेरी, अजिंठा चौक मार्गे वळविण्यात आलेली आहेत. धुळ्याकडून मुक्ताईनगर व संभाजीनगरकडे जाणारी वाहने यांच्याकरिता पर्यायी मार्ग एरंडोल, म्हसावद, वावडदा, नेरी, जामनेर मार्गे वळविण्यात आली आहे. जळगाव शहरातून भुसावळकडे जाणारी वाहनांसाठी पर्यायी मार्ग अजिंठा चौक, नेरी, जामनेरमार्गे वळविण्यात आलेली आहेत.