मुंबई ( वृत्तसंस्था ) – संशयीत दहशतवादी झाकीर हुसेन शेख व रिझवान इब्राहिम मोमीन यांचा दहशतवाद विरोधी पथकाने ताबा घेतला होता. ४ ऑक्टोबपर्यंत दोघांचाही ताबा एटीएसला मिळाला. आता आणखी एक अटक एसीटीएसने केली आहे. आतापर्यंत ही तीसरी अटक आहे.

महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत संशयित दहशतवादी मोहम्मद इरफान रेहमत अली शेख याला अटक केली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर या दहशतवाद्याच्या चौकशी नंतर एटीएसने मोहम्मद इरफान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर त्याला अटक केली आहे.
या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांशी संबंधित मुंबईतील ही तिसरी अटक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एटीएसने उघड केले की झाकीर आणि रिझवानच्या चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर आली, त्यानंतर मोमीन याला नागपाडा येथील त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली.







