बाजारपेठ पोलीस स्टेशनची कामगिरी
भुसावळ (प्रतिनिधी) : मुंबई येथे बालकाचे पॉक्सो दाखल गुन्ह्यात अरुण मस्के (रा. भुसावळ) यास मुंबई पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथून संशयीत पसार झाला. त्यास बाजारपेठ पोलिसांनी झेडटीसी परिसरातून रविवारी दुपारी अटक केली.
भुसावळातील रहिवासी संघर्ष अरुण मस्के यांच्याविरुद्ध मुंबई येथील सर जेजे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात बाजारपेठ पोलिसांनी एका मुलीसोबत त्या ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संशयित मस्के यास वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेले होते तेथून त्याने पोलिसांच्या हाताला धक्का देत पलायन केले. याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस हवालदार सोपान पाटील आणि रवींद्र भावसार यांना सूचना केल्या. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरात संशयीताचा शोध घेताना तो झेडटीसी परिसरातून पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले.