मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईत नवजात बाळाला वाचवण्याची अनोखी घटना समोर आली आहे. घाटकोपर येथील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यात वाहून जात होतं.
बाळ पाण्यात वाहून जात असताना सुरुवातीला मांजरानं पाहिलं. त्यानंतर मांजरानी ओरडण्यास सुरुवत केली. मांजराच्या ओरडण्यानं आजूबाजूची लोकं अलर्ट झाली. तेव्हा ही घटना उघडकीस आली.
आजूबाजूच्या लोकांना लगेचच पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नवजात बाळाला नाल्यामधून बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला.
मुंबई पोलिसांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिलं की, त्या नवजात अर्भकाला कपड्यात गुंडाळण्यात आलं होतं.
त्याला पाहून मांजरीनं आवाज करायला सुरुवात केली. यानंतर लोकांचं लक्ष नवजात अर्भकाकडे गेले. त्याला पाहताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे निर्भया पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
”सकाळी सकाळी बाईचं नाव घेऊ नये”, किशोरी पेडणेकर संतापल्या पोलीस पथकानं बाळाला नाल्यातून बाहेर काढले आणि राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, आता नवजात अर्भक धोक्याबाहेर असून प्रकृती ठिक आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये नवजात बालकाचा फोटोही शेअर केला आहे. 9 महिन्यांपासून पोटात वाढत होतं बाळ अन् महिलेला नव्हता थांगपत्ता; लग्नानंतर 17 वर्षांनी मिळालं सरप्राईज मात्र, या बाळाला नाल्यात सोडणाऱ्या आई-वडिलांची अद्याप ओळख पटलेली नाही. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.