मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापनदिन साजरा केला जात आहे. मनसेच्या या 14 व्या वर्धापनदिनानिमित्त आज नवी मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये पक्षाचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये घेतले होते.राज्यातल्या महाविकास आघाडीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेटचा ठराव पहिल्या अधिवेशना मांडला होता. या कॅबिनेटमध्ये मनसेच्या नेत्यांना खातेनिहाय जबाबदारीचे वाटप होणार आहे.आज या शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हा मेळावा होत आहे.