मुंबई – मायानगरी या नावानं देशभरात आणि जगभर प्रसिद्ध असलेलं मुंबई हे जगातील सर्वाधिक गर्दीचे शहरबनलं आहे.
58 देशांतील 404 शहरांच्या अभ्यासावर आधारित ताज्या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार, 2021 मध्ये मुंबई हे भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर आणि जगातील पाचवे शहर बनलं आहे. वर्षभरापूर्वी मॉस्कोनंतर हे जगातील दुसरं सर्वात गर्दीचं शहर ठरलं आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार, मुंबईत किमान 53 टक्के ट्रॅफिक जाम आढळून आलं आहे. म्हणजेच 15 मिनिटांचा मार्ग कव्हर करण्यासाठी मुंबईत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचा परिणाम असा होतो की, येथे दररोज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होतो. त्यामुळे मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईतील कोंडी अधिकच वाढली असून त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे.