जळगाव ( प्रतिनिधी ) – थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी आई बाहेर गेली असता घरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली. शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राधिका भागवत भोसले (१५) असे मयत मुलीचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी राधिका ही आई व बहिणींसह जळगावातील इंद्रप्रस्थ नगरात भाड्याने घरात राहण्यासाठी आले होते. ३१ डिसेंबररोजी दुपारी आई थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी बाहेर गेली होती. आई बाहेर गेल्याचे पाहून राधिकाने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. थोड्याने वेळाने राधिकाची आई घरी आल्यावर मुलीने गळफास घेतल्याचे आढळून आले. मुलीचा मृतदेह पाहून आईने आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. शहर पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.