चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हिरापूर येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले आहे चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
हिरापूर येथून १७ वर्षीय मुलास अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना १५ नोव्हेंबररोजी दुपारी २:३० च्या सुमारास घडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलगा हा मामाकडे आलेला असताना हि घटना घडली बेपत्ता तरुण मिळून येत नसल्याने परिसरात नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही म्हणून वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३६३ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो हे कॉ पगारे हे करीत आहेत.