जामनेर ( प्रतिनिधी ) – येथे एका नराधमाने ६ वर्षीय बालिकेला घरात उचलून नेऊन विनयभंग केल्याची घटना ३१ डिसेंबररोजी दुपारी घडली त्या नराधमाला पीडितेच्या नातेवाईकांनी चोप दिला .पोलीस कारवाईसाठी गेल्यावर ताफ्यावर जमावाने दगडफेक केली .
२ पोलिसांना किरकोळ दुखापत झाली. पोलिस वाहनाच्या काचा फुटल्या १ डिसेंबररोजी घरी ६ वर्षीय पीडित मुलगी एकटी असल्याचे पाहून तिला घरात नेऊन पलंगाखाली लपवून तिचा विनयभंग केल्यामुळे मुलगी जोरात रडू लागली .तिचा आवाज ऐकू आल्यामुळे शेजारी महिलांनी मुलीला त्या नराधमाच्या तावडीतून सोडविले . नंतर मुलीचे नातेवाईक आले त्यांनी त्या नराधमाला जाब विचारला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला संतप्त नातेवाईकांनी आरोपीस चांगलाच चोप दिला त्याला किरकोळ जखमा झाल्या घटनास्थळी गर्दी झाली होती.घटनेची माहिती मिळताच पो नि किरण शिंदे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस ताब्यात घेतले ,यावेळी जमाव पांगविताना काही समाजकंटकांनी पोलीस वाहनावर दगडफेक केली त्यात २ पोलीस किरकोळ जखमी झाले पोलीस वाहनांचे नुकसान झाले . अमोल घुगे व सोनुसिंग डोभाल अशी जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत .
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनसार आरोपी हाफिज बेग मेहमूद बेग ( रा – जुना बोदवड रोड ) याच्या विरोधात भा द वि कलम ३६३,३५४,३४२,५०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ नुसार कलम ८ व १२ नुसार गुन्हा नोदविण्यात आला पुढील तपास पो नि किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ. नि अंबादास पाथरवट करीत आहेत.