जळगाव बसस्टँड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील नवीन बसस्थानकावर शनिवारी एक तरुणी बेपत्ता झाल्याची खबर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पितापुत्री जळगावी नवीन बस स्थानकावर आले असता, मुलीने पाणी मागितले. तेव्हा पिता पाणी घ्यायला गेला. जेव्हा परतला, तेव्हा मुलगी बेपत्ता झालेली दिसली.
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय मुलगी हिला सोडण्यासाठी तीचे वडील शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जळगावात नवीन बस स्थानक येथे आले होते. त्याठिकाणी मुलीने पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा वडील पाणी घ्यायला गेले. मात्र जेव्हा परतले, तेव्हा मुलगी जागेवर दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली, मात्र ती मिळाली नाही.
अखेर वडिलांनी शनिवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. तेथे त्यांनी खबर दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.