चोपडा शहरातील तापी नदी पुलावरील घटना
चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील तापी नदीच्या पुलावरून महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण २०० फूट उंचीवरून पडूनही पाणी ३ ते ४ फूट खोल असल्याने त्या बचावल्या आहेत. स्थानिक तरुणांनी वाचवले असून महिलेच्या पायाला मात्र दुखापत झाली आहे.
तापी नदीच्या पुलावरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील रहिवासी ममता गोपाल पाटील (३२) या विवाहितेने नदीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल. दोनशे फूट उंचावरून उडी मारल्याने महिलेचा डावा पाय फॅक्चर झाला आहे. जीवनाला कंटाळून या महिलेने आपली दोन्ही चिमुकले मुले नातेवाइकांकडे वेले येथे सोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तीन-चार फूट पाण्यात उडी मारल्याने त्या बचावल्या. त्यांनी उडी मारल्याचे पाहून नदीपात्रात असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेऊन महिलेला बाहेर काढले.
तात्काळ रुग्णवाहिकेतून महिलेला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावर तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आणि डॉ. चंद्रहास पाटील यांनी उपचार सुरू केले. या महिलेला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.