मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – प्रजासत्ताक दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात दरवर्षी प्रमाणे सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त निलेश रेवा भिल्ल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निलेश रेवा भिल्ल यांना मुक्ताईनगर वासियांनी एक आदराचे स्थान निर्माण करून दिले निलेश यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्कार 2016 ला मिळाला होता आणि निलेश रेवा भिल्ल यांना सातत्याने सहकार्य करणारे मुक्ताईनगर येथील सर्व तरुण मित्र मंडळी यांनी आज आपल्या सर्वांचा आवडता निलेश भिल्ल यांनी मुक्ताईनगर तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार श्वेता ताई संचेती व पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकामध्ये सार्वजनीक ध्वजारोहण केले.
याप्रसंगी मुक्ताईनगर येथील महसूल कर्मचारी,, पोलीस कर्मचारी नगरपंचायत कर्मचारी नगरसेवक तसेच विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, मुक्ताईनगर सिव्हीलसोसायटीचे सदस्य व मुक्ताईनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश भिल्ल यांनी ध्वजारोहण केल्यानंतर त्यांचे मन भरून आले आपण सर्व जणांनी मला हा जो मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो कारण मी एक गरीब मजूर आणि गरजू घराण्यातील व्यक्ती असून आज आपण मला ध्वजारोहणाचा मान दिला त्याबद्दल मी निलेश रेवा भिल्ल मुक्ताईनगर वासियांचे लक्ष्मण सापधरे (बबलुभाऊ) धनंजय सापधरे, प्रफुल्ल जेन, अंकत माळी, विवेक पोहेकर, गजानन मालगे, अमरदीप पाटील, शुभम तळेले, रवींद्र भालेराव,प्रशांत देशमुख,पुर्षोत्तम पोलाखरे, संतोष सापधरे आदींनी सहकार्य केले.