मुक्ताईनगर : -मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितित खा. राहुल गांधीचा वाढदिवस “संकल्प दिन” म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुक्ताईनगर उप रुग्णालय येथे जाऊन फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर जगदीश पाटील एड.अरविंद गोसावी बी डी गवई,एस ए भोईसर, प्रा. सुभाष पाटील सर (मेळसांगवे),शरद महाजन, नामदेव काका भोई, अनिल वाडीले, ,प्रा. पवन खुरपडे (शहराध्यक्ष काँग्रेस),एड.राहुल पाटील, दिनेश पाटील, राजू जाधव, नीरज बोरखेडे(विधानसभा अध्यक्ष) निखिल चौधरी, शिवाजी पाटील प्रकाश रोठे, गजानन पवार, एड. कुणाल गवई, राहील आसिफ खान, महेश खुळे, शेख भैय्या, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.