मुक्ताईनगर ;- खरिप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरच्यावतीने आज मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन या दरवाढीचा निषेध करण्यात आला तसेच हि दरवाढ रद्द न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी प स सभापती राजेंद्र माळी, प्रदिप साळुंखे,माजी सरपंच प्रविण पाटील, बापु ससाणे, आसिफ बागवान, शिवराज पाटील,संजय कोळी, राजु कापसे, सुनिल काटे, सुनिल पाटील, राजु चौधरी, व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी मोदी सरकार हाय हाय ,केंद्र सरकारचा निषेध असो, खतांची, पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.