जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी केल्या चोऱ्या
जळगाव (प्रतिनिधी) – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात जळगावमधील एक आणि धरणगावातील दोन अशा तीन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. दोन संशयितांना तालुका पोलिस स्टेशन तर एकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीचे आधारावर पथकातील सपोनि निलेश राजपुत, पो.उप निरी गणेश वाघमारे व पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, अशोक पाटील अशांचे पथकाने संशयीत आरोपी राजु भिमसिंग बारेला (वय- २३), दिपक सुमा-या बारेला )(वय-२९ दोघे रा. मधुकर नगर, धरणगांव) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशन आणि धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल गुन्ह्याची कबुली देऊन चोरीच्या दोन दुचाकी काढून दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे रमेश फुलसिंग देवरे (वय – २३ रा. श्रीकृष्ण लॉन ता. जि. जळगांव) यास ताब्यात घेवुन विचारपूस करता त्यांचे कडुन गुन्हा उघडकीस आणून त्याच्याकडून एक मोबाईल हा हस्तगत करण्यात आला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.